Jump to content

केशवराव भोसले नाट्यगृह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

केशवराव भोसले नाट्यगृह ऊर्फ पॅलेस थिएटर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील एक विख्यात नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह कोल्हापुरातील खासबाग भागात वसले आहे. थिएटरची मालकी सार्वजनिक असून व्यवस्था कोल्हापूर महापालिका पाहते. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन १४ऑक्टोबर १९१५ या दिवशी झाले आणि नूतनीकरण ९मे १९८४ला. प्रेक्षागृहाचे आकारमान ७७' x ४८’ इतके असून रंगमंचाचे २५’ x ३३’ आहे. रंगमंचासमोरचा मोठा दर्शनी पडदा जांभळ्या रंगाच्या मखमली कापडाचा आहे. तो ४४’ x १६’ या आकारमानाचा आहे. नाट्यगृह वातानुकूलित आहे. त्याची आसनसंख्या तळमजल्यावर ६४५ खुर्च्या आणि सज्ज्यामध्ये ३०७ खुर्च्या इतकी आहे.पुरेशी आग प्रतिबंधक व्यवस्था नसल्यामुळे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती च्या (9 ऑगस्ट) जयंती च्या आदल्या दिवशी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्य ग्रहाला 8 ऑगस्ट 2024 च्या रात्री भीषण आग लागून पूर्ण नाट्य गृह भस्मसात झाले.