Jump to content

अवलोकितेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अवलोकितेश्वर

अवलोकितेश्वर हा महायान या बौद्ध संप्रदायातील लोकप्रिय बोधिसत्त्वांपैकी एक आहे. महायान पंथात बोधिसत्त्वाचे महत्त्व वाढल्यामुळे ह्याला उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले.

कंबोडियाचा सातवा जयवर्मन राजा वारल्यावर झाल्यावर त्याचे जयवर्मन हे नाव बदलून त्याला अवलोकितेश्वर असे म्हणले जाऊ लागले होते असाही उल्लेख आहे. अवलोकितेश्वर म्हणजे कारुण्याचे प्रतीक असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]अवलोकितेश्वर म्हणजे ज्याची दयार्द्र नजर ही भूमीवरील व्याधी, पीडा, त्रस्तता भोगणाऱ्या लोकांकडे वळली आहे.

स्वरूप

[संपादन]

अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाच्या डोक्यावर मुकुट असतो आणि त्याला सहस्र हात असतात.